खटाव (जिल्हा सातारा) तलाठी आणि खासगी व्यक्तीला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

तलाठी बर्गे यांनी तक्रारदार यांना ५ सहस्र रुपये झेरॉक्सच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. नंतर तलाठी बर्गे रक्कम घेण्यासाठी आल्यावर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

गोवा : चोर्ला घाटाकडे जाणारा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद

गोवा-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक १ वरील चोर्ला घाट अवजड व्यावसायिक वस्तूंच्या वाहनांना २० सप्टेंबर २०२३ पर्यंत रात्री १० ते सकाळी ५ वगळता अन्य वेळी प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी, उत्तर गोवा यांनी मनाई केली आहे.

राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे ! – मंत्री नितीन गडकरी

जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत महाराजांनी कार्य केले आहे. धर्माच रक्षण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला  होणार ! –  नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मंदिरावरील भोंग्यांवरून उपविभागीय अधिकार्‍यांची मंदिर व्यवस्थापनाला नोटीस !

मशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ?

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

‘बारामती ऍग्रो’ कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील ‘बारामती ॲग्रो’ कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० सहस्र टन गहू सरकारी अधिकार्‍यांनी हडपला !

यावरून पाक साहाय्य करण्याच्याही पात्रतेचा नाही, हेच सिद्ध होते. अशा पाकला यापुढे साहाय्य करायचे का ?, हे भारतासह अन्य देशांनी ठरवले पाहिजे !

मूर्तीवरील नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाची मागणी

हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे.

नवी मुंबई महापालिका भटक्या मांजरांचीही करणार नसबंदी

सर्व महापालिकांनी असा निर्णय घेण्याविषयी विचार करावा; परंतु भटक्या श्वानांची नसबंदी करण्याची व्यवस्थित प्रक्रिया होत आहे किंवा नाही, याविषयी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिर्‍यांनी सांगितले पाहिजे !