भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी ! – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले.

‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य आवश्यक ! – आखाड्याच्या प्रमुखांचे प्रतिपादन

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यामध्ये राबवत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ या संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. सुनील घनवट यांनी अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची सध्या आवश्यकता ! – स्वामी श्री महाराज

भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, त्याला वाचवण्याचे काम करावेच लागेल. हे राष्ट्र निधर्मी केल्याने प्राकृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. निधर्मी शब्द घुसडण्यात आला आहे, त्याला आमचा विरोध आहे असे मार्गदर्शन हरिनगर येथील भागीरथ धामचे स्वामी श्री महाराज यांनी केले.

हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील ! – स्वामी श्रद्धानंद महाराज

तुम्ही जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहात ते चांगले आहे. हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील, असा विश्‍वास झारखंड येथील गोड्डा जिल्ह्यातील अध्यात्म अन् स्वदेशीचे प्रखर वक्ता, शाही पिठाधीश्‍वर स्वामी महर्षि मेंहीं हृदय धामचे स्वामी श्रद्धानंद महाराज यांनी येथे व्यक्त केला.

हिंदु राष्ट्र केवळ बळाच्या नव्हे, तर धर्माच्या आधारे स्थापन होणार ! – स्वामी अनंतानंद सरस्वती महाराज

या अभियानाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी अभयनंद महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी अनंतानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

बांगलादेशमध्ये गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत ! – अमेरिकेतील नेत्या तुलसी गबार्ड

क सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही….

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.