बांगलादेशमध्ये गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत ! – अमेरिकेतील नेत्या तुलसी गबार्ड

  • अमेरिकेतील एक राजकीय नेत्या बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी बोलतात. भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे करतात ? हे भारतीय राजकारण्यांना लज्जास्पद !
  • बांगलादेशातीलच नव्हे, तर बहुतेक इस्लामी देशांत विविध माध्यमांद्वारे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हे रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !
तुलसी गबार्ड

नवी देहली – बांगलादेशमध्ये गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत. पाक सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही, अशी खंत अमेरिकेतील नेत्या तुलसी गबार्ड यांनी बांगलादेशात हिंदूवरील आक्रमणांवरून व्यक्त केली आहे.