हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांना कुंभपर्व विशेषांक देतांना समितीचे श्री. सुनील घनवट

हरिद्वार, ४ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी जवळून पाहिले असून हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती निर्माण करण्याचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी येथे काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या वेळी ते मार्गदर्शन करत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, मध्यप्रदेश आणि राजस्थानचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.

अभियानांतर्गत करण्यात आलेले अन्य संपर्क

  • श्रीमद्भागवत कथा प्रवक्ता भागवत हंस आचार्य पंडित अभिषेक कृष्णम् महाराज म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने कार्य करत आहे. हे कौतुकास्पद आहे.’’ समितीच्या कार्याला सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत आपल्या भक्तांसह समितीच्या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • महामंडलेश्‍वर स्वामी ललितानंद गिरि महाराज, शांतीकुंज येथील क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. ओ.पी. शर्मा, श्रीराम मंदिराचे स्वामी अर्जुनपुरी महाराज, मोद नारायण आचार्य, खिचडीवाले बाबा यांचीही भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याची माहिती देऊन प्रदर्शन भेटीचे निमंत्रण देण्यात आले.