भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना हिंदूंच्या समस्यांचे निवारण अशक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशाची राज्यघटना आणि संसद ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे घोषित करत नाही, तोपर्यंत आपण मनाने कितीही भारताला हिंदु राष्ट्र मानले, तर त्याचा काहीच उपयोग नाही.

‘श्रीरामचरितमानस’चा अवमान करणारे बिहारचे मंत्री चंद्रशेखर आणि उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना तात्काळ अटक करा !

दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

(म्हणे) ‘शुक्रवारच्या नमाजानंतर संपूर्ण शहराला आग लावू !’ – इंदूर येथील धर्मांध मुसलमान

‘भारतातील मुसलमानांचे प्राण संकटात आहेत’, अशी आवई उठवणार्‍यांना आता यावरून जाब विचारणे आवश्यक !

रतलाम (मध्यप्रदेश) येथे मुसलमानांकडून पुजार्‍याला घरात घुसून मारहाण !

भारतात गेली अनेक दशके मशिदींवरील भोंग्यांचा दिवसातून ५ वेळा होणारा आवाज हिंदू सहन करत आहेत, जर हिंदूंनी अशाच प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर काय झाले असते, याचा विचार कुणी करील का ?

भंडारा येथे ‘पठाण’ चित्रपटाच्‍या विरुद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची निदर्शने !

चित्रपटगृहाच्‍या बाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाचे फलक जाळले !

खामगाव (जिल्‍हा बुलढाणा) येथे ‘पठाण’ चित्रपटाचा फलक फाडला !

खामगाव येथील ‘सनी पॅलेस’ या चित्रपटगृहात लावण्‍यात आलेल्‍या ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हिंदुत्‍वनिष्‍ठांनी फाडला, तसेच ‘अभिनेता शाहरूख खान मुर्दाबाद’च्‍या घोषणाही दिल्‍या.

‘पठाण’ चित्रपटाचा खेळ रहित करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र सेनेचे भागवत चित्रपटगृहाच्‍या समोर आंदोलन !

येथील भागवत चित्रपटगृह येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्‍टर (भित्तीपत्रक) काढून चित्रपटाचा निषेध केला.

कोणत्‍याही परिस्‍थितीत विशाळगडावर परत अतिक्रमण होता कामा नये ! – बाबासाहेब भोपळे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

विशाळगड येथील अतिक्रमण, तसेच तेथील ऐतिहासिक स्‍थळांची झालेली दुरवस्‍था या संदर्भात आमदार श्री. विनय कोरे यांनी पन्‍हाळा येथे एका बैठकीचे आयोजन केले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्‍यांना तात्‍काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘भारतात हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी या वेळी दिली.

‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा !

झारखंड सरकारचे धार्मिक स्‍थळाला पर्यटनस्‍थळ बनवण्‍याचे षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त झाले. असे असले, तरी धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी.