‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा !

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व सिंहभूमच्‍या (झारखंड) उपायुक्‍तांना सादर केलेल्‍या निवेदनातील मागणी

जैन पंथियांचे सर्वाेच्च तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले !

जमशेदपूर (झारखंड) – झारखंड राज्‍य सरकारने जैन समाजाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत पवित्र तीर्थस्‍थळ असलेल्‍या ‘सम्‍मेद शिखरजी’ला व्‍यावसायिक दृष्‍टीने पर्यटनस्‍थळ म्‍हणून विकसित करण्‍याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारने वर्ष २०१९ मध्‍ये काढली होती. त्‍यातील काही तरतूद परत घेतल्‍याने झारखंड सरकारचे धार्मिक स्‍थळाला पर्यटनस्‍थळ बनवण्‍याचे षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त झाले. असे असले, तरी धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पूर्व सिंहभूमच्‍या उपायुक्‍तांना देण्‍यात आले.

उपायुक्‍तांना निवेदन दिल्‍यानंतर धर्मप्रेमी आणि समितीचे कार्यकर्ते

या वेळी हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री एस्.के. भद्रा, जयंत दास, डी.टी.वी. प्रसाद, जॉय चक्रवर्ती, बी. अश्‍विनी, आनंद महाराणा, श्रीमती संगीता महापात्र आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुदामा शर्मा, बी.वी. कृष्‍णा आदी उपस्‍थित होते.


_______________________________________________