‘पठाण’ चित्रपटाचा खेळ रहित करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र सेनेचे भागवत चित्रपटगृहाच्‍या समोर आंदोलन !

सोलापूर, २७ जानेवारी (वार्ता.) – येथील भागवत चित्रपटगृह येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्‍टर (भित्तीपत्रक) काढून चित्रपटाचा निषेध केला. यापूर्वीच हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने ‘पाकप्रेमी अभिनेता शाहरूख खान याचा पठाण चित्रपट प्रदर्शित करू नये’, या मागणीचे निवेदन पोलीस, प्रशासन आणि चित्रपटगृह चालक आणि मालक संघटना यांना दिले होते, तसेच चित्रपट प्रदर्शित केल्‍यास आंदोलनाची चेतावणीही दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चित्रपटगृहासमोर मोठा बंदोबस्‍त ठेवला होता. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेऊन सोडून दिले.