संतांसह हिंदुत्वावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !

भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

हिंदुत्वनिष्ठांनी आमदार टी. राजासिंह यांची भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. या वेळी धर्मप्रेमी सौ. रेखा पाटील, सनातन संस्थेच्या साधिका सौ. लक्ष्मी हलगेकर आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी उपस्थित होते.

विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा

इतका कचरा गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून तो गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्तांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्या अकोला, बुलढाणा आणि धुळे  या जिल्ह्यांतील ‘संपर्क अभियाना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू ! – धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर

राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री, तसेच अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक हे सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भविष्यात सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू, अशी चेतावणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था धर्मनिरपेक्ष भारतात बंद करा !

‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे शाहूवाडी नायब तहसीलदारांना निवेदन

कर्नाटक राज्याने गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – पू. प्राणलिंग स्वामीजी, निपाणी गौसेवा कृती समिती

या वेळी श्रीकृष्ण भावामृत संघ (इस्कॉन), जैन समाज, राजस्थानी समाज, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीराम सेना, बजरंग दल, श्रीराम सेना हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था यांच्यासह अन्य गोप्रेमी उपस्थित होते.

बेंगळुरू येथील घटना केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचाच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कोणी असे निंदनीय कृत्य करण्यास धजावणार नाही – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

सनातनने मठ-मंदिरे यांच्या सुव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे ! – श्री. संजय शर्मा

‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गोवा विधानसभा निवडणुकीत कुणाचेही सरकार आले, तरी मुख्यमंत्री हिंदूच असला पाहिजे !

पणजी येथील हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात सर्वानुमते ठराव ! गोव्यात ७० टक्के हिंदू आहेत. शिवाय गोव्यातील ३४ हिंदूबहुल मतदारसंघांत उमेदवार हिंदूच असला पाहिजे, असा ठराव हिंदू रक्षा महाआघाडीच्या मेळाव्यात संमत !!!