गोव्यात दिवसभरात ९४ कोरोनाबाधित

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाच्या १ सहस्र २९७ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी ९४ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १२४ रुग्ण बरे झाले.

कोरोनाच्या बनावट लसीची विक्री करण्यासाठी गुन्हेगारी जगत सक्रीय होण्याची शक्यता ! – इंटरपोलची चेतावणी

लवकरच जगातील विविध देशांमध्ये कोरोनावर लस येण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरणला प्रारंभही होणार आहे.

काही आठवड्यांत कोरोना लसीचे संशोधन पूर्ण होईल ! – पंतप्रधान मोदी

सध्या जगभरात विविध आस्थापने कोरोनावरील लस वितरित करतांना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने अधिक आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पहात आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेही आहे.

पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची गोव्याने सिद्धता ठेवावी ! – डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

डीन डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत; मात्र कोरोनाची दुसरी लाट गोव्यात येऊ नये, यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाय करणे, आदींच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

एकीकडे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे त्याला प्रतिसाद न देता नियमभंग करणार्‍यांना शिक्षा करण्यालाही विरोध करते, हे हास्यास्पदच होय !

अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफ्.डी.ए.) पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त

नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे एफ्.डी.ए.कडून अशी मोहीम राबवली जावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार उपस्थितांची संख्यामर्यादा हवी – उच्च न्यायालय

सध्या लग्नसमारंभांत ५०, तर अंत्यसंस्कारात २० व्यक्ती सहभागी होण्यास अनुमती आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवावर कोरोनाचे सावट, मंदिर प्रदक्षीणेवर निर्बंध घातल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर

शासनाने मंदिरे चालू केली असली, तरी तेथे मोकळेपणाने फिरता येत नसल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाविषयी भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरिरावर गंभीर परिणाम झाल्याने वितरण थांबवण्याची चेन्नईच्या स्वयंसेवकाची मागणी

एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.