कोरोनाच्या बनावट लसीची विक्री करण्यासाठी गुन्हेगारी जगत सक्रीय होण्याची शक्यता ! – इंटरपोलची चेतावणी

नवी देहली – लवकरच जगातील विविध देशांमध्ये कोरोनावर लस येण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरणला प्रारंभही होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर इंटरपोलने अधिकृतरित्या जगाला चेतावणी देतांना म्हटले आहे की, गुन्हेगारी जगत लस येण्याच्या शक्यतेने सक्रीय होऊन बनावट लसींची विक्री करू शकतो. ही विक्री इंटरनेटद्वारे किंवा प्रत्यक्षरित्या केली जाऊ शकते.