गोव्यात दिवसभरात ९४ कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाच्या १ सहस्र २९७ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी ९४ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १२४ रुग्ण बरे झाले. दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे सध्या प्रत्यक्ष उपचार घेणार्‍या कोरोनाबाधितांची संख्या १ सहस्र ३८८ झाली आहे. गोव्यात आतापर्यंत ३ लाख ५६ सहस्र १०९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. यांपैकी आतापर्यंत ४८ सहस्र ४५९ जण कोरोनाबाधित आढळले. यांपैकी ४६ सहस्र ३७५ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ९५.७० टक्के आहे.