
नवी देहली – युरोपमधील बल्गेरिया देशात होऊन गेलेल्या महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची भाकिते वळोवेळी समोर येत असतात. आता समोर आलेल्या भाकितानुसार, वर्ष २०२५ मध्ये कर्करोगासारख्या घातक आजारांवर उपचार सापडतील. या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातही मोठे पालट होतील.’ बाबा वेंगा यांच्या या भाकिताचा विचार केला, तर रशियामध्ये कर्करोग टाळण्यासाठी लस बनवण्यात येत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.
बाबा वेंगा यांनी केलेल्या आणखी एक भाकितानुसार, वर्ष २०२५ मध्ये प्रयोगशाळेत कृत्रिम मानवी अवयव बनवण्यास प्रारंभ होईल. ज्यांना काही शारीरिक अपंगत्व आहे ,त्यांच्यासाठी हे चांगले असेल. जर एखाद्याला हात आणि पाय नसतील, तर ते कृत्रिम अवयव वापरून ही कमतरता भरून काढू शकतात.