ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर क्रिकेट खेळत भाजपचे आंदोलन

मैदाने मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्याची टीका

ठाणे, २२ एप्रिल (वार्ता.) – ठाणे रेल्वे स्थानक आणि नौपाडा या परिसरांजवळ गावदेवी, घंटाळी आणि भगवती अशी ३ मैदाने आहेत. तेथे वारंवार कार्यक्रम किंवा प्रदर्शन यांचे आयोजन केले जात असल्याने ती खेळण्यासाठी उपलब्ध नसतात, अशी खंत काही मुलांनी व्यक्त केली होती. भाजपचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी स्थानिक मुलांसमवेत ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर क्रिकेट खेळत आंदोलन केले. ‘ही मैदाने ८ दिवसांत स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी करून न दिल्यास या मुलांसोबत आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू’, अशी चेतावणी या वेळी महानगरपालिकेला देण्यात आली. (मुलांच्या सुविधेसाठी आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)