बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश

नाशिक येथील प्रस्तावित कुंभमेळा

मंत्रीमंडळ

नाशिक – कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरातील वाढती वाहतूक, तसेच साधू, संत, महंत आणि भाविक यांची होणारी गर्दी यांचा विचार करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (रिंग रोडचा) प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नाशिक शहरात येणार्‍या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नाशिक बाह्यवळण रस्त्याच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळ सभागृहात आढावा घेतला. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.