
सावंतवाडी – स्वामी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ५ सहस्र योग अभ्यासकांचे भव्य शिबिर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती स्वामी रामदेव बाबांचे परम शिष्य पूज्य स्वामी परमार्थ देवजी यांनी दिली. पतंजलि योग समितीच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सावंतवाडी येथे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या निवासस्थानी पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग शाखेच्या योग अभ्यासकांना पूज्य स्वामी परमार्थ देवजी यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी स्वामी परमार्थ देवजी म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला रोगमुक्त करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी घरोघरी योग शिकवला जाणार आहे. येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनापूर्वी संपूर्ण जिल्हा योगमय करण्याचा संकल्प पतंजली योग समितीने केला आहे. आज प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रोगाने त्रस्त आहे. कोरोना महामारीनंतर, तर रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि औषधोपचारांनीही ती पूर्णपणे बरी होतांना दिसत नाही. अशा स्थितीत रोगमुक्त होऊन सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.’’
सिंधुदुर्ग जिल्हा पतंजलि योग समितीचे जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर यांनी स्वामी परमार्थ देवजी यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला बाबली गवंडे, प्राध्यापक सुभाष गोवेकर आदी उपस्थित होते.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !