
प्रयागराज, १० फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पत्तापाळधी गावातील १६ धर्मप्रेमी युवकांनी कुंभक्षेत्रातील सेक्टर ९ मधील सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन कक्षाला भेट दिली. कुंभक्षेत्रात सनातन संस्थेचा धर्मप्रचार करणारे प्रदर्शन पाहून या युवकांना पुष्कळ आनंद झाला. प्रदर्शनाच्या बाहेर एकत्रितरित्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, अशा घोषणा देत या युवकांनी आनंद व्यक्त केला.
या युवकांनी प्रदर्शनामध्ये धर्म आणि अध्यात्म यांविषयीचे सर्व फलक वाचले अन् साधकांकडून साधना समजून घेतली. संस्थेच्या कार्याने प्रभावित झाले. या वेळी त्या युवकांनी ‘आम्ही सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन स्वत:च्या गावातही धर्मप्रसाराचे कार्य करू’, असे सांगितले.