
प्रयागराज, १३ फेबु्रवारी (वार्ता.) – जम्मूतील वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी सनातन संस्थेच्या मोरी-मुक्त मार्ग चौक येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी या विद्यार्थ्यांसमवेत वेदपाठशाळेचे संचालक डॉ. स्वामीराजन महापात्र उपस्थित होते.
भारतवर्षात सनातन संस्थेसारख्या अन्य संस्था निर्माण झाल्या, तर भारत पुन्हा एकदा विश्वगुरु बनेल ! – डॉ. स्वामीराजन महापात्र
प्रदर्शन पाहिल्यानंतर अभिप्राय व्यक्त करतांना डॉ. स्वामीराजन महापात्र म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे आहे. आमच्या विद्यार्थ्यांना ज्या काही शंका होत्या, त्यांचे निरसन हे प्रदर्शन पाहून झाले. भारतवर्षात सनातन संस्थेसारख्या अन्य संस्था निर्माण झाल्या, तर सनातन धर्माची ऊर्जा सर्वदूर पोचेल आणि भारत पुन्हा एकदा विश्वगुरु बनेल.’’