प्रयागराज कुंभपर्व २०२५
भारतातील सर्व राज्यांसह अनेक विदेशी नागरिकांचा सहभाग !

प्रयागराज, ३ फेब्रुवारी (वार्ता.) : महाकुंभमेळ्यात सनातनच्या ग्रंथांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हिंदु धर्माचे शिक्षण सोप्या, सुलभ आणि शास्त्रीय भाषेत देणारी सनातनची ग्रंथसंपदा जिज्ञासूंना आकर्षित करत आहे. ग्रंथप्रदर्शन चालू झाल्यापासून १० जानेवारी ते २ फेब्रुवारी या १४ दिवसांच्या कालावधी कुंभमेळ्यातील मोरी-मुक्ती चौकातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला २५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे.

यामध्ये भारतातील सर्व राज्यांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, कॅनडा, इंडोनेशिया, मलेशिया या देशातील नागरिकांचा समावेश आहे.
ग्रंथप्रदर्शन पाहून जिज्ञासू इतके प्रभावित होत आहेत की, काही जिज्ञासू स्वत:च्या भाषेतील ग्रंथांचा सर्व संचाची मागणी करत आहेत.

ग्रंथ प्रदर्शनाला भेट देणारे काही जिज्ञासू तर पुन:पुन्हा नवीन जिज्ञासूंना घेऊन ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी येत आहेत. काही जिज्ञासूंनी त्यांच्या राज्यांमध्ये सनातनच्या ग्रंथ वितरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे, तर काही जण स्वत:सह आप्तेष्टांसाठीही ग्रंथांची मागणी करत आहेत. अनेकांनी ग्रंथ घेतल्यावर अन्य ग्रंथांच्या मागणीसाठी सनातनचे संकेतस्थळ आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक मागून घेत आहेत. हिंदी, बंगाली, कन्नड आणि मराठी भाषेतील ग्रंथांना विशेष प्रतिसाद लाभत आहे.
सनातनचे ग्रंथ येथे ‘ऑनलाईन’ उपलब्ध !
सनातनचे विविध १७ भाषांतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने ‘https://sanatanshop.com/’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंना ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने हवी असल्यास ९१६७५१२१६१ या क्रमांकावर संपर्क करता येईल.