गोव्यात आजपासून जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

राज्यात चालू हंगामात आतापर्यंत एकूण ११८ इंच पाऊस पडला असून पावसाने सरासरी लक्ष्य पार केले आहे. आता पडणारा पाऊस अतिरिक्त असेल ! ऐन गणेशचतुर्थीच्या काळात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने लोकांना मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण होत आहे.

ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाईसाठी गोवा शासनाकडून २७ अधिकार्‍यांची सूची प्रसिद्ध 

व्यावसायिक ध्वनीप्रदूषणावरील निर्बंध हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत, तर दुसर्‍या बाजूला जागरूक नागरिकांचा आरोप आहे की, रात्रीच्या वेळी संबंधित अधिकार्‍यांना लाच देऊन पार्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण केले जात आहे.

शाळांमधून चालू असलेला इस्‍लामी प्रचार रोखा ! – जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ

विद्यालयामध्‍ये इस्‍लामी आतंकवाद पसरवून त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचा हा प्रकार आहे ! गोव्‍यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्‍या पाहिजेत अन्‍यथा या षड्‍यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्‍याची शक्‍यता आहे. गोव्‍यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्‍वेषण करून विद्यार्थ्‍यांमध्‍ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्‍याचे षड्‍यंत्र रोखायला हवे.

गोवा : अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत अनधिकृतपणे साठवलेले मिठाई बनवण्यासाठीचे ‘खोदळ’ कह्यात

केवळ सण जवळ आले की, अशी कारवाई न करता नेहमीच असे प्रकार उघडकीस आणायला हवेत आणि जरब बसेल असा दंड आकारायला हवा !

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची ई-सिगारेटचा वापर आणि विक्री यांवर आळा घालण्याची मागणी

हे आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या लाभासमवेत दिसून येणारे त्यांचे दुष्परिणाम अन् समाजातील साधनेअभावी झालेला नैतिकतेचा र्‍हास !

गोवा पर्यटन विभागाच्या ‘गोवा टॅक्सी ॲप’चे अनावरण

‘‘गोवा टॅक्सी ॲप’ विनामूल्य आहे. तणावमुक्त वाहतुकीचा लाभ घेता यावा, यासाठी हे ‘ॲप’ आहे. ही सेवा २४ घंटे उपलब्ध असेल. पर्यटक आणि गोमंतकीय यांना याचा लाभ होईल. या सेवेसाठी परिवहन संचालकांनी संमत केलेल्या किमती आकारल्या जाणार आहेत.’’

काही अतृप्त लोक गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पहात आहेत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘ख्रिस्ती लोक श्री गणेशचतुर्थीसाठी हिंदूंच्या घरी येतात, तर हिंदु नाताळामध्ये ख्रिस्त्यांच्या घरी जातात. ही गोव्याची परंपरा गेली अनेक वर्षे चालू आहे; मात्र काही अतृप्त लोक हे बिघडवू पहात आहेत. सर्वांनी गोव्यात शांती आणि सलोखा अबाधित ठेवावा.’’

गोवा : शॅक व्यवसायासाठीची वयोमर्यादा हटवली !

‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.’’

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची उसगाव, फोंडा (गोवा) येथे धाड

आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या आहेत !

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा

कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !