श्री गणेशचतुर्थीच्या काळात फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंध

ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षासाठी रात्री १२ नंतर प्रतिबंध आणि हिंदूंच्या सणांवेळी रात्री ८ ते रात्री १० असा वेगळा नियम का ? मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे कधीही अयोग्यच ! यामुळे प्रदूषण होण्याबरोबरच आजारी, वृद्ध आदींना त्रास होतो. असे असले, तरी एकाच देशात २ धर्मियांसाठी वेगळे नियम का ?

गोवा : विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाचे केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !

गोवा : हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नका !

‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल.

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याच्या आदेशास सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित न झाल्यास गोव्यातील वनक्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे, असे मत पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. गोवा खंडपिठाच्या निवाड्याला आव्हान दिल्याच्या प्रकरणी प्रा. केरकर यांनी हे मत व्यक्त केले.

गोव्यातून भाग्यनगरला अमली पदार्थाची वाहतूक करणारे जाळे उद्ध्वस्त : तेलंगाणा पोलिसांची कारवाई

लिंगमपल्ली अनुराधा हिने ‘ती गोव्यातून अमली पदार्थ आणत होती’, याची स्वीकृती पोलिसांना दिली आहे. संशयित लिंगमपल्ली अनुराधा आणि तिचे दोन मित्र भाग्यनगर येथे जेवणाचा डबा पुरवण्याचे केंद्र चालवत होते.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात महिला कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी कर्मचारी निलंबित

गेल्या ७५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमातून साधनेद्वारे नैतिकता न रुजवल्याचा परिणाम ! गोव्यासारख्या छोट्या राज्यात शिक्षक, पोलीस आणि आता रुग्णालयातील कर्मचारी यांनी महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार वाढल्यास नवल नाही !

प्राचीन तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्यात जहाजबांधणी होणार !

‘‘भारताला पुष्कळ समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा लाभलेली आहे आणि यामुळे प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.’’

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

गोव्यात वर्ष २०११ पासून ३ सहस्र २८६ लोकांनी केल्या आत्महत्या !

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक ! साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते.