गोवा : शॅक व्यवसायासाठीची वयोमर्यादा हटवली !

(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरील उपाहारगृह आणि मद्यविक्री केंद्र)

पणजी, १४ सप्टेंबर (वार्ता.) – किनारी भागात शॅक व्यवसाय करण्यासाठी ६० वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले,

‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. गोव्यातील खाद्यपदार्थांचा पुरवठा करणे, हे शॅक व्यावसायिकांना बंधनकारक आहे. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.

यापुढे शॅक व्यवसायामध्ये ‘डिजिटल कोस्ट’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे शॅक व्यावसायिकांना ‘पी.ओ.एस्.’ यंत्र पुरवले जाणार आहे.’’