पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात पूर्वीपासून धार्मिक सलोखा टिकून आहे आणि गोव्यात सर्व धर्मांतील लोक एकमेकांचे सण अन् उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करत असतात; मात्र अलिकडे काही अतृप्त लोक गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
(सौजन्य : In Goa 24×7)
ते पुढे म्हणाले,
‘‘ख्रिस्ती लोक श्री गणेशचतुर्थीसाठी हिंदूंच्या घरी येतात, तर हिंदु नाताळामध्ये ख्रिस्त्यांच्या घरी जातात. ही गोव्याची परंपरा गेली अनेक वर्षे चालू आहे; मात्र काही अतृप्त लोक हे बिघडवू पहात आहेत. सर्वांनी गोव्यात शांती आणि सलोखा अबाधित ठेवावा.’’