Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभपर्वात चौकाचौकांत उभे राहून सर्वांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

भाविकांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन करणार्‍या साधिका

प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) : महाकुंभपर्वात विविध अध्यात्मिक संस्थांचे अनेक धार्मिक उपक्रम चालू आहेत. ‘सत स्वरूप ज्ञान विज्ञान संस्थे’च्या साधिकांकडून कुंभक्षेत्री चौकाचौकांत उभे राहून येणार्‍या सर्व भाविकांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येत आहे. अत्यंत उत्साहाने या साधिका दिवसभर रस्त्यावरून ये-जा करणार्‍या सर्वांना ध्वनीक्षेपकाद्वारे ‘श्रीरामनाम घ्या आणि नशा करणे सोडून द्या’, असे आवाहन करत आहेत.