Outrageous Incident In Waghoda-Jalgaon : धर्मांधांनी झळकावले औरंगजेब, टिपू सुलतान आणि ओवैसी बंधू यांची चित्रे असलेले फलक !

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथील संतापजनक घटना !

ओवैसी बंधूंच्या फलकावर १५ मिनिटांचा उल्लेख !

मिरवणुकीमधील फलक

वाघोदा (जळगाव) – येथे १६ जानेवारी या दिवशी मुसलमानांनी काढलेल्या संदलमध्ये (मिरवणूक) औरंगजेब, टिपू सुलतान आणि ओवैसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते. संदल होऊन २ दिवस झाले, तरी पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदू संतप्त झाले आहेत. ‘हिंदूंनी अफझलखान वधाचा फलक लावल्यावर स्वतःहून कारवाई करणारे पोलीस आता का शांत बसतात ? आता राज्यातील सरकारने याविषयी कठोर पावले उचलावीत’, अशी येथील हिंदूंची मागणी आहे.

१. वाघोदा येथे मुसलमान समाजाने संदल काढलेली होती. (याची लेखी अनुमती घेतली होती कि विनाअनुमती हा प्रकार चालू होता, याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक)

२. संदलमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या मुसलमानांतील काही युवकांनी हातात आक्षेपार्ह फलक धरले होते.

३. यात टिपू सुलतान, औरंगजेब, ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमचे – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) असदुद्दीन ओवैसी, अकबरुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील आदींचे फलक बनवण्यात आलेले होते. (छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शंभूराजांना क्रूरपणे मारणार्‍या औरंगजेबाचे फलक कसे काय लावू दिले जातात ? यावर पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाही ? राज्यात या चित्रावर बंदी आणायला हवी. – संपादक)

४. यातील ओवैसी बंधूंचे छायाचित्र असलेल्या एका फलकावर ‘१५ मिनिटे’ असे लिहिलेले होते. असे चिथावणीखोर फलक पकडणार्‍यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

५. संदलमध्ये स्थानिक पोलीसही उपस्थित होते; पण त्यांनीही यासंदर्भात काहीच केले नाही.

पोलिसांकडे तक्रार आली नसल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा

या फलकांच्या संदर्भात पोलिसांकडे कुणीही तक्रार केली नसल्याने त्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही, असे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (जर असे असेल, तर हिंदूंनी तक्रार करायला हवी आणि अशा घटनांच्या संदर्भात पोलिसांनी स्वतःहून कारवाई करायला हवी अन् ते करत नाही, याची माहिती गृहमंत्रालयालाही देणे आवश्यक आहे. ‘एक हैं तो सेफ हैं’ या आधारे सत्ता मिळवल्यानंतर हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न होतांनाही दिसणे आवश्यक आहे ! – संपादक)