सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात हिंदु मुलीला धर्मांधाने पळवल्याची तक्रार प्रविष्ट !

  • ‘पालिका प्रशासन’ या यूट्यूब वाहिनीकडून प्रसारित व्हिडिओत कथन केलेली घटना !

  • पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा हतबल आईचा गंभीर आरोप !

नवी मुंबई – बेलापूर गाव येथील शिवकाली रावत या महिलेने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात त्यांची मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी फसवली गेल्याची तक्रार केली आहे; परंतु ३ पोलीस ठाण्यांत तिला पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप तिने केला आहे. ‘पालिका प्रशासन’ या यूट्यूब वाहिनीवर तिचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तिला फसवलेल्या समीर शेख या मुलावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याचेही या महिलेने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

४ जानेवारीला अल्पवयीन मुलीला फसवून नेल्याची तक्रार या महिलेने केली होती. ती कामावर गेल्यावर मुलीला घरातून नेल्याचे या महिलेने सांगितले. बेलापूर एन्.आर्.आय. पोलीस ठाणे, स्थानकाजवळील पोलीस ठाणे, पनवेल पोलीस ठाणे यांनी तिच्या तक्रारी प्रविष्ट करून घेतल्या नाहीत. सीबीडी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखवण्यात आलेल्या सीसीटीव्हीत या महिलेची मुलगी, तसेच नजमा शेख ही महिला आणि समीर शेख हे रेल्वे स्थानकावरून जातांना दिसत असल्याचे या महिलेने मुलाखतीत सांगितले. मुलगी त्या स्थळी परत दिसली, तेव्हा तिने बुरखा घातल्याचेही दिसत होते. नजमाच्या मुलीचाही या प्रकरणी हात असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. नजमा यांचे पूर्ण घर या कारस्थानात सहभागी असल्याचा या महिलेचा आरोप आहे. (अशांवर कारवाई कधी होणार ? – संपादक)

येथील नगरसेवक रोहिदास पाटील यांच्याकडेही संबंधित महिलेने तक्रार केली आहे, असे तिने व्हिडिओत सांगितले.

वारंवार पोलीस ठाण्यात जाऊनही ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईला पोलीस टाळत असल्याचे तिने सांगितले. पोलीस केवळ ‘चौकशी करत आहोत’, असे सांगत आहेत. पोलीस तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने महिला हतबल झाली आहे. प्रथमदर्शनी अहवालात पोलिसांनी आईला संशय असलेल्या मुलाचे नावही नोंद करून घेतले नाही.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंकडे पूर्णतः दुर्लक्ष करणारे कर्तव्यच्युत आणि मुसलमानधार्जिणे पोलीस हे विसरतात की, जिहाद्यांच्या दृष्टीने तेही काफीरच आहेत !
  • हिंदूंनो, मुलींना लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण द्या !
  • नवी मुंबईतील हिंदुत्वनिष्ठ संघटना काय करत आहेत ?