मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दाहवी-बारावीच्या परीक्षेच्या सभागृह प्रवेशपत्रावर (‘हॉल तिकिटा’वर) आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे.
शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद योग्य झाली आहे का ? हे पालक आणि विद्यार्थी यांना कळावे, यासाठी हा उल्लेख असल्याचे स्पष्टीकरण मंडळाकडून देण्यात आले आहे.
कागदपत्रावर जातीची नोंद चुकली असेल, तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयात योग्य ती कागदपत्रे सादर करून तो पालट करून घेता येईल, असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागाला विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देता यावा, यासाठी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांची जातनिहाय आकडेवारी द्यावी लागते. त्यासाठी याचा उपयोग होईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
अनेक शिक्षणतज्ञांनी मंडळाच्या या निर्णयाविषयी खेद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांची ओळख मंडळाच्या परीक्षांमध्ये पुढे आणली जात नाही. त्यांचा परीक्षाक्रमांक परीक्षकाला कळू नये, यासाठी त्यावरही ‘स्टिकर’ लावले जाते. असे असतांना हे स्पष्टीकरण न पटणारे आहे, असे शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|