हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट करणार्या संबंधित अधिकार्यांवर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करावी, अशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांची ‘एक्स’ पोस्टद्वारे मागणी !
(हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते.)

मुंबई – मी १५ जानेवारी या दिवशी आय.आर्.सी.टी.सी. (भारतीय रेल्वे खाद्य सेवा आणि पर्यटन महामंडळ) ‘मुंबई-हावडा एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२३२२) मधून प्रवास करत असतांना, भोजनासाठी प्रवाशांनी मांसाहारी पदार्थ मागवले असता प्रत्येक प्रवाशाला ‘हलाल चिकन’ देत असल्याची गोष्ट निदर्शनास आली. मागणी (ऑर्डर) घेतांना प्रवाशांना ‘तुम्हाला कोणता मांसाहारी पदार्थ हवा आहे?’, असे विचारून सक्तीने ‘हलाल चिकन’ दिले जात आहे. ही पुष्कळ गंभीर गोष्ट आहे. ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या अधिकृत गाड्यांमध्ये ‘झटका चिकन’ (झटका म्हणजे प्राण्यांची मान एकाच घावात कापली जाते आणि त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.) उपलब्ध नाही. हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट का केले जात आहे ? यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, हे त्वरित थांबवावे आणि संबंधित अधिकार्यांवर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करावी, अशी पोस्ट हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘एक्स’वर केली आहे. श्री. घनवट यांनी या संदर्भात एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
Yesterday on the 15th January, IRCTC is serving #Halal chicken in 👉 “Mumbai Howrah Express”, Train number 👉 12322 to each and every passenger. Why are Hindus being corrupted ?
While taking the order, the staff is giving compulsorily #halal chicken to the passenger while… pic.twitter.com/vOvTi3znyU
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) January 16, 2025
‘मुसलमान प्रवाशांना हलाल मांस लागते, तर हिंदु प्रवाशांनी झटका मांस मागितल्यास ते उपलब्ध करून देणार का ? बहुसंख्य प्रवासी हिंदु असतांना त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती का ?’ असे प्रश्न रेल्वेच्या कर्मचार्यांना विचारले असता कर्मचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असे श्री. घनवट यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.