Kolkata RG Kar Doctor’s Tragic Case : आरोपी संजय रॉय याला न्यायालयाने ठरवले दोषी !

  • कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण

  • २० जानेवारीला सुनावण्यात येणार शिक्षा

आरोपी संजय रॉय

कोलकाता – येथील राधा गोविंद कर (आर्.जी. कर) रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर ९ ऑगस्ट २०२४ च्या रात्री बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला सियालदाह न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

रॉय याला २० जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आंदोलन केले होते. या घटनेनंतर या रुग्णालयावर आक्रमणही करण्यात आले होते. जनतेच्या आंदोलनानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते.