सोलापूर येथील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी घोषित !

सोलापूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. संजय साळुंखे, तर सचिवपदी श्री. अमर बोडा यांची एकमताने निवड करण्यात आली.

पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार; प्रशासनाने विरोध केल्यास मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवणार !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक

गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना तातडीने थांबवा !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि सांगली महापालिका यांना निवेदन

‘हरित गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – राहुल रोकडे, उपायुक्त, सांगली महापालिका

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’, तसेच हरित साजरा करावा, असे आवाहन करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आवाहन का करत नाही ?

गणेशोत्सव मद्यमुक्त झाला पहिजे ! – खासदार गिरीश बापट

देण्याची प्रवृत्ती असेल, तर समाज सुखी होईल, हे गणेशोत्सवातून शिकायला मिळते. गणेशोत्सव मंडळे समाजात क्रांती करतील, तसेच गणेशोत्सव हा मद्यमुक्त झाला पाहिजे. जागतिक पातळीवर गेलेला उत्सव खाली आणता कामा नये.

अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक थांबवा ! – आमदार विजयकुमार देशमुख, भाजप

वर्षानुवर्षे श्री गणेशमूर्तींची विक्री, तसेच गौरींचे मुखवटे यांच्या विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर व्यापारी ५ फुटांचा मंडप घालतात; मात्र महापालिका प्रशासन अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक करत आहे, हा प्रकार थांबायला हवा.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासाच्या वेळी शक्य असल्यास साधकांनी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने ठेवावीत. सहप्रवाशांना त्यांचे महत्त्व सांगून प्रसार करावा.

कर्नाटकमध्ये श्री गणेश मंडपांत श्री गणेशमूर्तीच्या शेजारी वीर सावरकरांचे छायाचित्र लावणार ! – हिंदु संघटनांचा निर्णय

गणेशोत्सवात वीर सावरकरांविषयी जनजागृती करणार ! – प्रमोद मुतालिक

नाशिक येथे गणेशोत्सव मंडळांना अनुमती शुल्क माफ !

आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळांसाठी परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय २० ऑगस्ट या दिवशी घेतला असून महापालिकेत तसा ठराव करण्यात आला आहे.

गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

अनेक गणेशभक्त परगावांतून श्री गणेशचतुर्थीसाठी आपल्या गावी जातांना ‘मी गणपतीला किंवा गणपतीसाठी गावी जात आहे’, असे म्हणतात. आपण गणपतीसाठी गावी जात नसतो, तर त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो.