गणेशोत्‍सवानिमित्त राज्‍यातील मिरवणूक मार्गाच्‍या डागडुजी करण्‍याविषयीचा शासनाचा आदेश !

गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने राज्‍यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्‍याचा आदेश राज्‍यशासनाने दिला आहे. ४ सप्‍टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी आणि गणेशोत्‍सव यांनिमित्त मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेण्‍यात आली.

‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती

काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विक्री दुकानांना परवाना नसल्यास उपायुक्तांची कारवाईची चेतावणी !

आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.

अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे ! – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. येथील अलंकार सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत महत्त्वाच्या दिवशी मद्य आणि माडी विक्री बंद रहाणार !

गणेशोत्वसाच्या कालावधीत तीन महत्त्वाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, तसेच विदेशी मद्य आणि माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद रहातील-जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी ५ वर्षांची अनुमती मिळणार !

मंडळांनीही योग्य प्रतिसाद द्यावा. वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मूर्ती विसर्जन करतांना उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.