केपे, २७ ऑगस्ट (वार्ता.) केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने २७ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सव सोडत कूपन विक्री चालू केली. शुभारंभप्रसंगी लोकांची प्रचंड गर्दी उसळली. गर्दीमुळे गोंधळ उडाला. सोडत कूपन खरेदीसाठी पहाटे ५ वाजल्यापासून लोक रांगेत उभे होते. कूपन विक्रीचा शुभारंभ झाल्यानंतर लोकांनी प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. या गोंधळात प्रवेशकक्षही मोडले. गर्दी आवरणे कठीण होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना पाचारण करण्यात आले. यानंतर आयोजकांनी वार्षिक सोडत कूपन विक्री २८ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत पुढे ढकलली.
सोडत कूपन विक्रीच्या शुभारंभप्रसंगी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सा.बां.मंत्री नीलेश काब्राल, खासदार तथा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केपेचे आमदार अॅल्टन डिकोस्ता आदींची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर म्हणाले, ‘‘गर्दीमुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणून त्यावर उपाययोजना करण्यात आली.’’
संपादकीय भूमिकासार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे व्यावसायीकरण झाले आहे. लोक स्वलाभासाठी सोडत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. |