श्री गणेशमूर्ती शास्‍त्रानुसारच हवी !

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्‍हास, ग्‍लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्‍याचे आव्‍हान आपल्‍यापुढे उभे आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !

अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या ९९ मंडळांची अनुमती नाकारली !

रस्‍त्‍यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ९९ सार्वजनिक मंडळांना मुंबई महापालिकेने अनुमती नाकारली आहे.

विधान परिषदेच्‍या उपसभापतींच्‍या बैठकीला गणेशोत्‍सव मंडळे अनुपस्‍थित !

आगामी गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी बोलवलेल्‍या बैठकीकडे पुणे शहरातील गणेशोत्‍सव मंडळांनी पाठ फिरवली.

गणेशोत्‍सव, दहीहंडी उत्‍सव शांततेत आणि उत्‍साहात साजरा करा !

गणेशोत्‍सव, दहीहंडी, तसेच अन्‍य आगामी सण- उत्‍सव शांततेत आणि उत्‍साहात साजरे करावेत, त्‍यादृष्‍टीने सर्व संबंधित यंत्रणा अन् मंडळांनी समन्‍वयाने काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले.

शिवसेनेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी विनामूल्य गाड्या सोडण्यात येणार !

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) एस्.टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचा व्यय शिवसेनेकडून देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातून या बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी.

आरे वसाहतीच्‍या तलावातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणार ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

कित्‍येक वर्षांपासून येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ‘वनशक्‍ती’ संघटना ही नेहमीच हिंदु समाज आणि विकास यांच्‍या प्रश्‍नांच्‍या विरोधात भूमिका घेते’, असा आरोपही आमदार भातखळकरांनी केला आहे.

सोलापूरमधील शास्‍त्रीनगर परिसरात २ गटांत दगडफेक !

दगडफेकीचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. दगडफेकीमध्‍ये काही युवक घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करत अटक केली आहे.

गणेशभक्‍तांनो धर्महानी रोखा !

एका मूर्तीकाराने शेतकर्‍याच्‍या वेशात हातात भिंगरी असलेली प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्‍याचे छायाचित्र एका दैनिकात प्रसिद्ध झाले. सध्‍या ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) म्‍हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींच्‍या गणेशमूर्ती बनवल्‍या जातात.