आता बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.

शेतकर्‍यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन !

शेतकर्‍यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने शेतकर्‍यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री श्री रविशंकर म्हणाले की, तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे.

… तर आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य मिळणार नाही ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र

पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच आर्थिक साहाय्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. कर्जबाजारीपणा, नापीकता या कारणामुळे आत्महत्या झाली, तरच शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य देण्यात येईल.

शेतकरी उघड्यावर असतांना मुख्यमंत्र्यांच्या देहलीच्या वार्‍या चालू आहेत ! – उद्धव ठाकरे, ठाकरे गटप्रमुख

नवस बोलणे आणि नवस फेडणे यासाठी वारंवार त्यांना देहली येथे जावे लागते. आजचा दिवस गेला आहे म्हणून नवस फेडतो. उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करतो. यासाठीच त्यांच्या देहली येथे वार्‍या चालू आहेत; पण यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे ?

आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्यातील १५ लाख शेतकरी कुटुंबांचा होणार सर्वे !

यापूर्वी प्रशासनाने अनेक वेळा शेतकरी कुटुंबाचा सर्वे घेतला होता, त्याचे काय झाले, हेही शेतकर्‍यांना समजले पाहिजे. त्यामुळे आता सर्वे करण्यासमवेत त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा.

एक दिवस माझ्या बळीराजासाठी !

खरेतर शेतकर्‍यांचे नैराश्य घालवण्यासाठी अन्य समस्यांसमवेत शेतकर्‍यांना येणार्‍या समस्येला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमासमवेत शेतकर्‍यांच्या मनावर आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अंकित करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !

मुंबई येथील मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकर्‍याचा उपचाराच्या वेळी मृत्यू !

२३ ऑगस्ट या दिवशी पावसाळी अधिवेशन चालू असतांना मंत्रालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील तांदूळवाडी गावातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला होता.

विद्यमान सरकारच्या काळात १३७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र चालू आहे. राज्यात प्रतिदिन सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून गेल्या ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.