कुणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्‍या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.

देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.

देहलीत हिंसा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

राजकारण्यांच्या कार्यक्रमांवर गुन्हे नोंद नाहीत; मात्र सामान्य माणसांवर का ? – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ट्रॅक्टर मोर्चा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

कृषी कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार करणारे पवार खरे कि आंदोलनाला पाठिंबा देणारे पवार खरे ? – भाजप

केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.

औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता !

शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी त्यांची माहिती पाठवावी.

केंद्र सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून शेवटचे उपोषण

आजही शेतकर्‍यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते- अण्णा हजारे

शेतकरी वळले मसाला पिकांकडे

जिल्ह्यातील ६० टक्के शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन या पिकांमध्ये हानी झाल्याने येत्या हंगामात या पिकांऐवजी मसाला पिकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

काँग्रेसशासित राज्यांतील शेतकर्‍यांकडून होणारे आंदोलन कृषी कायद्याविरोधात नाही, तर सीएए, एन्.आर्.सी. आणि श्रीराममंदिराचे दुःख ! – साक्षी महाराज, खासदार, भाजप

उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनावर केली.