सांगलीत एफ्आरपी आंदोलनाच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये झटापट

आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन स्थगित केले.

शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !

शेतकर्‍यांच्या लाभाच्या विधेयकाला राजकारणासाठी विरोध केला जात आहे ! – भाजप नेत्यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ  ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला.

ऊस आंदोलनाची ठिणगी भडकली

एकरकमी ‘एफ्आर्पी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन चालू केले आहे. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवून दिलेे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शेती प्रश्‍नांविषयी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलनाची चेतावणी

सर्वच पक्ष स्वार्थी असून ते केवळ आपल्या पक्षाचे हित पहातात. त्यांना खरोखरच समाजाविषयी तळमळ असती, तर आज सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय त्यांना दिसत नाही का ? असा प्रश्‍न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला

बांधकाम घोटाळ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही साहाय्य शेतकर्‍यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे मी उघडकीस आणले आहेत.

माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या मनातले मोदींनी करून दाखवले ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कृषी कायद्याला समर्थन दिले मात्र काहींची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून याला विरोध करण्यात आला.

(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

शेतकरी आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे, हेच यातून लक्षात येते ! सरकारने अशांना शोधून त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करणे आवश्यक आहे आणि याप्रकरणी शेतकरी संघटनांनीही स्पष्टीकरण द्यायला हवे !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्यास निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा पोलिसांनी रोखली 

कडकनाथ संघर्ष यात्रा रोखतांना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलीस यांची झटापट झाली.

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !