कुंभमेळ्यातील हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. सागर गरुड, प्रतिनिधी, प्रयागराज

बांगलादेशात होणार्‍या हिंदूंवरील अत्याचारांसंदर्भातील फलकांची माहिती भाविकांना देेतांना श्री. मिलिंद पोशे

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभात हिंदु जनगागृती समितीच्या वतीने सेक्टर ६ मध्ये हिंदु राष्ट्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. येथे हिंदूंवर देश-विदेशात होणारे अत्याचार, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद, गोसंवर्धन आणि गोसंरक्षण, हिंदूंचे संघटन, हिंदूंना धर्मशिक्षण का हवे ? आणि हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता यांविषयी जागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत. हिंदूंचे धर्माचरणाविषयीचे ज्ञान वाढवणारे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी जागृती करणारे ग्रंथप्रदर्शनही येथे आहे.

१. हिंदु धर्मावर होणारे आघात, मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य यांसारखे अनेक व्हिडिओ येथील व्हिडिओ कक्षात दाखवण्यात येत आहेत. प्रदर्शनाला युवक-युवती, भाविक, आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

२. ‘‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले, तरच हिंदू सुरक्षित रहातील’’, अशी प्रतिक्रियाही अनेक भाविक येथे व्यक्त करत आहेत. अनेक युवकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शवली आहे.

क्षणचित्र

समितीच्या शिबिराबाहेर लावलेले भगवान श्रीकृष्ण, आदि शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि स्वामी विवेकानंद यांच्या चित्रांसह ‘जयतु जयतु हिन्दूराष्ट्रम् ।’ आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी जागृती करणारे ग्रंथप्रदर्शन’ या फलकांकडे आकर्षित होऊन मोठ्या संख्येने भाविक प्रदर्शन पहाण्यासाठी येत आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाची काही छायाचित्रे :