

श्री. सागर गरुड, प्रतिनिधी, प्रयागराज
प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – कुंभक्षेत्रातील सेक्टर ९ मध्ये सनातन संस्थेकडून धर्मविषयक ज्ञान देणारे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि आचारधर्म, धर्माचरणाचे महत्त्व आणि धर्माविषयी हिंदूंना जागृत करणारे फलक यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून महाकुभंमेळ्यात येणारा तरुण वर्ग मोठ्या संख्येने या प्रदर्शनाकडे आकर्षित होत असतांना दिसून येत आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी प्रयागराज येथील कु. रचना पाल, कु. नंदीनी पाल आणि कु. अंकिता आर्या या आल्या होत्या. त्यांना येथे कपाळावर कुंकु लावून धर्माचरण करण्याविषयीचे महत्त्व सांगण्यात आले. हे महत्त्व पटल्यामुळे त्या युवतींनी तत्परतेने प्रदर्शनाच्या ठिकाणीच कपाळावर कुंकु लावले. तरुणवर्गातील अनेकांनी धर्माचरणाविषयी या गोष्टी त्यांना सनातनच्या प्रदर्शनातून समजल्या, असे व्यक्त केले. सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी करण्यासाठीही भाविकांची गर्दी होत आहे.