कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र प्रदर्शन’ पाहिल्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया

श्री. सागर गरुड, प्रतिनिधी, प्रयागराज
प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्रातील सेक्टर ६ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र प्रदर्शना’ला संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. छत्तीसगड येथील कबीर पंथाच्या अनुयायांनीही हे प्रदर्शन पाहिले. त्यांच्याशी दैनिक ‘सनातन प्रभात’ने संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, हिंदु साधू-संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होत आहेत, हे प्रदर्शन पाहिल्यावर समजले. देशभरात हिंदु महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांची संख्या पहाता हिंदूंनी संघटित होणे किती आवश्यक आहे, हे लक्षात आले. आपल्या जीवनात असणार्या दु:खांवरील उपाययोजना या प्रदशर्नातून मिळते. सर्व हिंदू जर संघटित झाले, तरच हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण होऊ शकेल.