दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ‘ईडी’कडून अटक !

मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’ने दापोली तालुक्याचे माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना १४ मार्चला अटक केली.

‘ईडी’च्‍या कारवाईच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका !

सक्‍तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना १३ मार्चला मुंबईत उपस्‍थित रहाण्‍याविषयी नोटीस बजावली होती; मात्र हसन मुश्रीफ यांनी ‘ईडी’समोर स्‍वत: उपस्‍थित न रहाता त्‍यांचे अधिवक्‍ता प्रशांत पाटील यांच्‍या वतीने मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

‘ईडी’च्या धाडीतून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती उघड !

देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही !

तेलंगाणातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्या के. कविता यांची चौकशी !

देहली येथील अबकारी धोरण, म्हणजेच मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील घरावर ‘ईडी’ची धाड !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी धाड घातली. २ मासांत ‘ईडी’ने मुश्रीफ यांच्यावर केलेली ही तिसरी कारवाई आहे.

उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

‘साई रिसॉर्ट’वर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे – माजी आमदार संजय कदम

लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आदींच्या १५ ठिकाणांवर ‘ईडी’च्या धाडी

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्‍या कोठडीत १४ दिवसांची वाढ !

कुख्‍यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने माजी मंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्‍ये अटक केली होती.

संभाजीनगर घरकुल घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी !

महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ ! ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !

सर्वाेच्च न्यायालयाकडून हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांची याचिका रहित !

कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.