राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्‍या कोठडीत १४ दिवसांची वाढ !

नवाब मलिक

मुंबई – कुख्‍यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने माजी मंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्‍ये अटक केली होती. त्‍यांच्‍या जामीन अर्जावर झालेल्‍या सुनावणीत त्‍यांच्‍या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्‍यात आली आहे.