सर्वाेच्च न्यायालयाकडून हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांची याचिका रहित !

पैशांचा अपहार केल्याचे प्रकरण

नवी देहली – उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील न्यायालयात हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. या खटल्याला आव्हान देणारी याचिका अय्युब यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने रहित केली.

न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रह्मण्यम् आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांच्या खंडपिठाने गाझियाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात अय्युब यांना प्रश्न उपस्थित करण्याची अनुमती दिली. कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.