(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा गुन्हा काय ?’

अशा प्रकारचा प्रश्न विचारून बर्क वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत ! त्यांच्या अशा प्रश्नांना कुणीही भीक घालणार नाही; कारण देशातील सर्व जनतेला ही संघटना काय आहे, आता ठाऊक झालेले आहे !

‘एन्.आय.ए.’च्या महाराष्ट्रातील धाडीत १६ जण कह्यात !

महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.

१२ राज्यांत एन्.आय.ए. आणि ईडी यांच्याकडून पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : १०६ जणांना अटक

राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्‍यांना अटक

कर्ज देणार्‍या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘ईडी’ने ‘पेटीएम्’, ‘इझीबझ’ आदींचे ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्वरित कर्ज देणार्‍या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘पेटीएम्’, ‘रेझरपे’, ‘कॅशफ्री’ आणि ‘इझीबझ’ यांच्या माध्यमातून ठेवलेल्या व्यापारी खात्यांमधील ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे अंमलबजावणी संचालनालयाला निर्देश

मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामीन मिळावा, यासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत.

‘ईडी’कडून देशभरात ३० ठिकाणी धाडी !

आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला !

आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ‘अंमलबजावणी संचलनालया’ने (‘ईडी’ने) मागील वर्षी अनिल देशमुख यांना ११ घंट्यांच्या चौकशीनंतर अटक केली होती.

खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ

पत्राचाळ भूमी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आस्थापनाची ‘ईडी’कडून चौकशीला प्रारंभ !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार संचालक असलेल्या ‘ग्रीन एकर रिसॉर्ट्स अ‍ॅण्ड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाच्या प्राथमिक चौकशीला अंमलबजावणी संचानलयाकडून (‘ईडी’कडून) प्रारंभ करण्यात आला आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या ठिकाणांवरील धाडीमध्ये २ ‘एके-४७’ रायफली सापडल्या !

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी घातल्या आहेत. त्यांच्या कपाटांमध्ये २ ‘एके ४७’ रायफली मिळाल्या आहेत.