हानीकारक अहंकार !

इंग्रजांनी जगातील ज्‍या देशांवर राज्‍य केले, तेथे त्‍यांनी त्‍यांची संस्‍कृती, परंपरा, खेळ आदी नेले; मात्र मोजक्‍याच देशांनी इंग्रजांचे राज्‍य गेल्‍यावर त्‍यातील काही गोष्‍टी स्‍वीकारल्‍या, तर अनेकांनी अस्‍मिता म्‍हणून नाकारल्‍या.

दंगलखोर निष्‍पाप ?

राज्‍यात शिवमोग्‍गा, हुब्‍बळ्ळी आदी ठिकाणी झालेल्‍या दंगलींमध्‍ये अटक करण्‍यात आलेल्‍या ‘निष्‍पाप’ तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍याची सूचना राज्‍याचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी केली आहे.

पुण्‍यावर आतंकवादाचे सावट !

पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्‍या साहाय्‍यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्‍लिपर सेल’ यांच्‍याविषयीची निष्‍क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्‍य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्‍या सावटाखाली येऊ न देण्‍याचे आव्‍हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !

दिशा योग्‍यच; पण..!

भारत ही त्‍याच्‍या व्‍यापारासाठी अत्‍यंत मोठी बाजारपेठ आहे. व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून चीन प्रत्‍येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्‍यासाठी चिनी मालावर बहिष्‍कार घालण्‍याचा संस्‍कार जनतेवर करावा लागेल !

‘ऑनलाईन गेम’चा जुगार !

‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्‍बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्‍हा एक हरतो, तेव्‍हाच दुसरा जिंकतो. यामध्‍ये हरणारे प्रसंगी आयुष्‍यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्‍थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे.