शेवटची १५ मिनिटे !

आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांची वाट पहाण्यापेक्षा जीवन जगतांनाच प्रतिदिन १५ मिनिटे देऊन आत्मचिंतन करून स्वतःत सुधारणा केली पाहिजे, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस खर्‍या अर्थाने गोड होईल !

युक्रेन-रशिया युद्धाचा भारतियांसाठी बोध !

भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ’, अशी स्थिती आहे. लयाची देवता असलेल्या महादेवाची उपासना करणारे भारतीय खरे तर देव, अवतारी संत आणि ऋषिमुनी यांच्या कृपेमुळेच तरून जात आहेत. येत्या युद्धकाळातही भक्त तर तरून जाणारच; तरीही भारतियांनी सर्व स्तरांवर स्वतःची सिद्धता ठेवणे श्रेयस्कर !

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबच्या किरणोत्सर्गाचा परिणाम जपानमधील लोक आजही भोगत आहेत, तर आताच्या अणूबाँबचा परिणाम पुढील किती शतके मानवजातीला भोगावा लागेल, याची कल्पना करता येत नाही.

युक्रेनला वाली कोण ?

राष्ट्रासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा, मुत्सद्दी आणि मुख्य म्हणजे आपले मित्र अन् शत्रू कोण ? याची उत्तम जाण असणार्‍या नेत्याच्या हाती राष्ट्र सोपवणे का आवश्यक असते, हे अधोरेखित झाले. झेलेंस्की यांनी ज्यांना मित्र म्हटले, त्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली….

युद्धातूनी शिकावे !

‘बळी तो कान पिळी’, हाच जगाचा नियम आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास पूर्वीचे राजे चक्रवर्ती होते आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. इंग्रजांच्या काळात लचके तोडले गेले. एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान यांना धूळ चारायची असेल, तर भारताने स्वयंसिद्ध होणे अपरिहार्य ! अशाने भारताला गतवैभव मिळवणे शक्य होईल !

हे दाऊदचे अराष्ट्रवादी समर्थक !

मोठा गाजावाजा करून कारवाई चालू करायची, थोडे केल्यासारखे काहीतरी दाखवायचे आणि नंतर साटेलोटे झाले की, काढता पाय घ्यायचा, हे या तरी प्रकरणात होऊ नये. भारतीय जनतेला विसराळूपणाचा शाप आहे. आपल्याकडे मोठी प्रकरणेही एवढी घडत असतात की, पुढचे काही घडले की, जनता जुने सर्व विसरून जाते.

प्रगल्भ प्रज्ञानंद !

दुर्दैवाने आज आपल्या देशात एकीकडे क्रिकेटसारख्या विदेशी आणि अत्यंत खर्चिक खेळाचे स्तोम माजले असतांना दुसरीकडे बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शासकीय पातळीवर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. अशा देशी खेळांना जर खर्‍या अर्थाने राजाश्रय मिळाला, तर देशात अनेक ‘प्रज्ञानंद’ निर्माण होऊन देशाचे नाव उंचावतील !

संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !

एफ्.ए.टी.एफ्. : भारत आणि भारतीय !

राष्ट्राच्या संदर्भात निर्णय घेतांना ‘जग काय म्हणेल?’, असा विचार केला जात नाही. अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारखे देश असा विचार करतांना कधीच दिसत नाहीत. ते ‘राष्ट्र सर्वाेपरि’ असाच विचार करून निर्णय घेतात आणि कृतीही करतात. इतकेच नव्हे, तर जागतिक व्यासपिठावर स्वतःची शक्ती दाखवून देतात. भारत स्वतःच्या संदर्भातही असा वागत नाही, हे अपेक्षित नाही.