‘जमियत’ची चौकशी हवी !

जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !

अरविंद नेगी ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यातील प्यादे ?

भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी अरविंद नेगी यांच्यावर आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा होणारा आरोप पहाता त्यांच्या चौकशीतून देशातील हिंदुविरोधी षड्यंत्र बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अन्वेषण यंत्रणांनी याची कसून चौकशी करून देशवासियांपुढे सत्य ठेवावे, अशी अपेक्षा आहे.

जिवावर उठलेले पाश्चात्त्य संगीत !

हिंदु धर्मात ज्या १४ विद्या आणि ६४ कला सांगितल्या आहेत, त्यांपैकी संगीत एक आहे. हे संगीत (हल्लीचा धांगडधिंगा नव्हे) ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे. स्वप्तस्वरांच्या माध्यमातून व्यक्तीचा बाह्य जगताकडून ईश्वरप्राप्तीकडे प्रवास घडवण्याचे सामर्थ्य प्राचीन भारतीय संगीतात आहे.

भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची चाचपणी !

‘कान्व्हेंट’ शाळेत हिंदु मुलींच्या धर्माचरणाला विरोध होतो, तेव्हा निधर्मीवाले कुठे असतात ?

गनेडीवाला यांचे त्यागपत्र !

गनेडीवाला यांनी दिलेले निकाल केवळ संवेदनाहीन नसून महिलांचे खच्चीकरण करणारे आहेत, अशी जनतेची भावना आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी चांगले न्यायाधीश पदावर येणे, हे सामाजिक हितासाठी अत्यंत आवश्यक आहे.

राणा अय्युब यांची चोरी !

सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !