Maharashtra Mandir Nyas Parishad : द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत टिपलेले काही विशेष क्षण !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !

मंदिर-न्यास परिषदेची फलनिष्पत्ती !

१६ जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त अधिवेशना’त स्थानिक विश्वस्तांचे एकत्रीकरण करून स्थानिक मंदिराच्या अडचणी आणि समस्या यांवर चर्चा होईल !

श्रीक्षेत्र आळंदीसह सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! – आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

वारकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

Goa Mandir Parishad : मंदिर परिषदेला बार्देश, पेडणे आणि डिचोली येथून १५० हून अधिक मंदिरांचे विश्‍वस्त सहभागी होणार

या परिषदेत मंदिरांच्या समस्या, पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी आदी प्रश्‍नांवर ऊहापोह होऊन त्यावर पुढील ध्येयधोरण निश्‍चित केले जाणार !

२६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची ३ डिसेंबर या दिवशी सांगता झाली. २ दिवसांसाठी आयोजित या परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या विश्‍वस्तांनी २६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे सांगितले.

ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर परिषदेत ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिर परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

(म्हणे) ‘मंदिरात वस्त्रसंहिता म्हणजे भक्तांचा अपमान केल्यासारखे !’

मंदिराचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अनेक मंदिरांमध्ये ‘छायाचित्र काढण्यास बंदी आहे’, असे लिहिलेले असते, मग तोही भक्तांचा अपमान म्हणणार का ? त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी केलेली नियमावली कधीही अपमानकारक नसते.

मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर महासंघाच्या माध्यमातून पंढरपूरसह अनेक मंदिरांतील समस्यांसंदर्भात आपण फार मोठे कार्य करत आहात. आम्ही ही सहकार्य करू.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा -महाविद्यालये, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे.

हिंदुहिताचे वचन देणार्‍यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा !

हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल.