मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

 दापोली आणि खेड येथील मंदिर विश्वस्त बैठकीला सकारात्मक प्रतिसाद !

दापोली – मंदिरांच्या विरोधात एका बाजूला धर्मांध, सेक्युलरवादी, पुरोगामी यांच्या आघाड्या काम करत आहेत. वक्फ कायद्याचा अपलाभ घेत मंदिरे, मंदिरांच्या भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसर्‍या बाजूला सुव्यवस्थापनाच्या नावाखाली मंदिरांच्या संपत्तीची लूट चालू आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरातील साडेचार लाखांहून मंदिरांचे सरकारीकरण झाले; मात्र एकाही मशीद ,चर्चचे सरकारीकरण झालेले नाही. मंदिर संस्कृती रक्षणासाठी आता हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यसमन्वयक श्री. सुनील घनवट यांनी २० नोव्हेंबर या दिवशी शहरातील जालगाव-ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत केले. या बैठकीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या बैठकीचे सूत्रसंचालन समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी केले.

या वेळी सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले की, आपण मंदिराचे रक्षण करण्यासाठी संघटित होणे महत्त्वाचे आहे, तसेच पुणे येथे होणार्‍या मंदिर परिषदेसाठी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

महालक्ष्मी देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. सुरेश रेवाळे म्हणाले की, मंदिर विश्वस्तांचे तालुकास्तरावरील अधिवेशन होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील विश्वस्तांचे संघटन करणे सोपे जाईल.

विशेष

१. पाच विश्वस्तांनी पुणे येथील परिषदेला जाण्याची सिद्धता दर्शवली.

२. श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड; श्री भार्गवराम देवस्थान, कोळबांद्रे; श्री विमलेश्वर मंदिर मूर्डी आणि कड्यावरील श्री गणपति देवस्थान, आंजर्ले या देवस्थानांनी देवळाबाहेर वस्त्रसंहितेचे फलक लावण्याचे घोषित केले.

३. दोन मासांतून एकत्र येण्याचा निर्धार विश्वस्तांनी केला.

उपस्थित मान्यवर :

या बैठकीसाठी श्री महालक्ष्मी देवस्थानचे सचिव श्री. सचिन भांबिड, कड्यावरील श्री गणपति देवस्थानचे कार्याध्यक्ष श्री. सुरेश म्हादलेकर, मुरुड येथील दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष श्री. सदानंद साटले, हर्णे येथील श्री देव एकनाथ देवस्थानचे अध्यक्ष श्री. भरत जोशी, जालगाव श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री. अशोक जालगावकर,  दापोली येथील श्री. मारुति आणि श्री देव शंकर मंदिराचे विश्वस्त श्री. हसमुख पांगारकर, श्री मारुति देवस्थानचे विश्वस्त श्री. अनंत कडू, श्री काळकाई मंदिराचे विश्वस्त श्री. संदेश शिंदे, कोळबांद्रे येथील श्री भार्गवराम मंदिराचे विश्वस्त श्री. मंदार जुवेकर, आसूद येथील श्री देवी झोलाई  देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रकाश शिर्के, मुर्डी येथील श्री विमलेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. शशिकांत पेंडसे, श्री विठ्ठल, राम, हनुमान मंदिराचे अध्यक्ष कमलेश मुसलोणकर, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांसह १२ मंदिरांचे २१ विश्वस्त उपस्थित होते.

खेड येथील श्री पाथरजाईदेवी मंदिराच्या सभागृहात मंदिर विश्वस्तांची बैठक :

२० नोव्हेंबर या दिवशी शहरातील श्री पाथरजाईदेवी मंदिराच्या सभागृहात मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समितीचे श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, तसेच शहरातील श्री खेडजाई, रेडजाई, जाखमाता देवस्थानचे विश्वस्त श्री. संतोष दांडेकर, श्री पाथरजाईदेवी देवस्थानचे माजी अध्यक्ष श्री. विनोद पाटणे, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शेटये पाटणे, श्री लक्ष्मी नारायण देवस्थानचे कार्यवाहक श्री. सुरेंद्र जोशी, श्री शिवमंदिर खांबतळे देवस्थानचे सदस्य श्री. गोपाळ करवा, श्री साई मंदिराचे विश्वस्त श्री. समीर पाटणे, श्री. अमित लढ्ढा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड आणि श्री. शिवाजी सालेकर उपस्थित होते.

क्षणचित्र

१. दोन महिन्यातून एकदा मंदिर विश्वस्त यांची बैठक घेण्याचे ठरले.
२. श्री खेडजाई रेडजाई देवस्थानचे २ विश्वस्त पुणे येथील मंदिर मंदिर परिषदेला उपस्थित रहाणार असून अन्य विश्वस्तांनी याविषयी सकारात्मकता दर्शवली.

अभिप्राय :

१. श्री. संजय मोदी, श्री मुरली मनोहर देवस्थान उत्सव कमिटीचे अध्यक्ष : मंदिरांच्या  संदर्भातील ज्या गोष्टी ठाऊक नव्हत्या त्या समजल्या. मंदिर महासंघाच्या माध्यमातून पंढरपूरसह अनेक मंदिरांतील समस्यांसंदर्भात आपण फार मोठे कार्य करत आहात. आम्ही ही सहकार्य करू. काही मंदिरात पर्यटक तोकडे कपडे घालून येतात, हे विश्वस्तांनी थांबवायला हवे.

२. श्री. भरत कार्ले, श्री खेडजाई रेडजाई जाखमाता देवस्थानचे अध्यक्ष :  मंदिरांविषयी उद्बोधक माहिती मिळाली, मंदिरांसमोर प्रशासकीय अडचणीसमवेत ज्या समस्या येताहेत, त्यासंदर्भात मंदिर महासंघाचे परिणामकारक कार्य होत आहे, मंदिर विश्वस्तांसाठी मंदिर व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण मिळायला हवे.