
पश्चिमी संस्थांकडून प्रसिद्ध केल्या जाणार्या हास्यास्पद आणि पक्षपाती अहवालाचा आणखी एक नमुना पहा. २० मार्च या दिवशी ‘जगातील सर्वांत आनंदी देशां’विषयीचा ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५’ हा अहवाल प्रकाशित झाला. यात भारताचे स्थान ११८ एवढे खाली दाखवण्यात आले. तुम्हाला माहिती आहे का ? भारतापेक्षा आनंदी, समाधानी देश आणि नागरिक जगात कोण आहेत ? या अहवालानुसार…..
१. जगभरातून भीक मागून स्वतःचा सरकारी व्यय चालवणारा, जागतिक आतंकवादाचे केंद्र, गरिबी, महागाई यांमध्ये अग्रस्थानी असणारा पाकिस्तान आणि तेथील जनता भारतापेक्षा आनंदी (स्थान १०९)
२. सतत हिंसा आणि संघर्ष यांच्या छायेत असणारे पॅलेस्टिनी नागरिक भारतापेक्षा आनंदी (स्थान १०३)
३. हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवणारा सौदी अरेबिया आणि तेथील जनता भारतापेक्षा समाधानी (स्थान ३२)
४. गेल्या २ वर्षांत रशिया समवेतच्या संघर्षात जो युक्रेन उद्ध्वस्त झाला, तेथील जनता भारतापेक्षा समाधानी (स्थान १११)
यापेक्षा हास्यास्पद आणि पक्षपाती काय ? (२२.३.२०२५)
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.