संकटग्रस्त देशांना साहाय्य करणारा भारत !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

नुकत्याच झालेल्या भूकंपाने म्यानमार, थायलंड हादरले… भारताने त्वरित या देशांना साहाय्यासाठी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ चालू केले ! संकट कोणत्याही देशावर येवो… साहाय्यासाठी पहिला हात भारताचाच ! संयुक्त राष्ट्रांच्याही पूर्वी भारताची साहाय्याची विमाने तिथे पोचतात ! नेपाळ, श्रीलंका, मालदीव, भूतान, अफगाणिस्तान हे इस्लामी देश आणि युरोपियन देशांतही भारताने साहाय्याच्या मोहिमा राबवल्या ! कोरोना महामारीच्या काळात केवळ आपल्याच नागरिकांना मायदेशी आणले नाही, तर इतर देशांच्या नागरिकांनाही त्यांच्या देशात पोचवले. हीच भारताची संस्कृती आपल्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. (२९.३.२०२५)

अमेरिकेकडून भारतातील निवडणूक पद्धतीचे कौतुक !

जी अमेरिका जगाला लोकशाहीचे धडे देत; लोकशाही, मानवाधिकार यांच्या संकल्पनांच्या उगमाचे श्रेय घेते, तीच अमेरिका आज भारताच्या लोकशाहीचे गोडवे गात आहे ! अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारतातील निवडणूक पद्धतीचे कौतुक केले आहे ! ‘भारत मतदार ओळखपत्र ‘बायोमेट्रिक डेटा’शी जोडतो आहे आणि अमेरिका मात्र नागरिकत्वासाठी स्व-साक्षांकनावर निर्भर आहे’, असे ट्रम्प यांनी नुकतेच जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे ! (२७.३.२०२५)

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.