![]()
१. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा ‘टेरिफ’ (आयात शुल्क) दणका चीनला बसल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. चिनी वस्तूंसाठी अमेरिकेची बाजारपेठ भविष्यात मिळणे अवघड असल्याने आणि अमेरिकेशी तणाव वाढणार असल्याने चीनने आता भारतासमवेत संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. भारत-चीन राजनैतिक संबंधांच्या इतिहासात पहिल्यांदाच चीनने जानेवारी ते मार्च २०२५ या केवळ ३ मासांत ८५ सहस्र भारतियांना व्हिसा दिला आहे. यासाठी चीनने त्याच्या व्हिसा धोरणात शिथिलता आणली आहे. भारताशी व्यापारी संबंध सुधारण्यासाठी चीनची ही धडपड आहे.

२. अमेरिकेने चिनी वस्तूंवर २४५ टक्के आयात शुल्क लावल्याने भारतासाठी ही मोठी संधी आहे. चीनमधून अमेरिकेला होणारी निर्यात आता प्रचंड महाग झाली आहे. यामुळे भारताला जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनण्याची मोठी संधी आहे. कपडे, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अमेरिकेला पुरवण्याची उत्तम संधी; पण सिंगापूर, तैवान, जपान हे देश स्पर्धेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे चीन धूर्त आहे, तो त्याचा माल वेगवेगळ्या देशांतून अमेरिकेला पाठवू शकतो.
३. ट्रम्पच्या ‘टेरिफ’ धोरणाचे चीनवरील नकारात्मक आणि भारतासाठी सकारात्मक परिणाम आता दिसायला प्रारंभ झाला आहे. भारतात ग्रेटर नोएडामध्ये ‘ॲपल’ आस्थापनाचे ‘टॉप ग्लोबल व्हेंडर’ (जागतिक स्तरावरील अव्वल पुरवठादार) ‘फॉक्सकॉन’ हा नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या सिद्धतेत आहे. यासाठी ३०० एकर भूमीची ‘यमुना एक्सप्रेस वे’वर (यमुना द्रुतगती महामार्गावर) पहाणी चालू आहे. वर्ष २०२५ अखेरपर्यंत प्रत्येक ४ पैकी १ ‘आयफोन’ भारतात उत्पादित केलेला (मेड इन इंडिया) असेल !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !